swabhimani shetkari sanghatana, manchar, bhimashankar sahakari sakhar karkhana saam tv
मुंबई/पुणे

Swabhimani Shetkari Sanghatana : मंत्र्यांवर राेष...; पुणे- नाशिक महामार्ग 'स्वाभिमानी' ने राेखला

Manchar Protest News : एक रुग्णवाहिका रस्त्यावर येताच आंदाेलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन माणुसकीचे दर्शन घडवले.

रोहिदास गाडगे

Manchar News : ऊसाला ३४०० रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी मंचर येथे पुणे - नाशिक महामार्गावर आज (साेमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोकाे आंदाेलन छेडले. या आंदाेलनात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेकडाे शेतकरी सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

ऊसाला ३४०० हमीभाव द्या, भिक नको आम्हांला घामाचे दाम द्या असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली हाेती. यावेळी आंदाेलकांनी भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (bhimashankar sahakari sakhar karkhana) व्यवस्थापना विरोधात घाेषणा दिल्या.

ऊसाच्या हमीभावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन भिमाशंकर साखर कारखान्यावर उपोषण सुरु आहे. या उपोषणाला प्रतिसाद मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आक्रमक झाल्याचे चित्र हाेते.

सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या विराेधात देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली. स्वतचा खाजगी कारखाना वाचविण्यासाठी भिमाशंकर सहकारी साखर कारखाना डब्यात टाकण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी केला.

दरम्यान या वेळी एक रुग्णवाहिका रस्त्यावर (pune nashik highway) येताच आंदाेलकांनी (aandolan) रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन माणुसकीचे दर्शन घडवले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT