Maratha Protesters Saam
मुंबई/पुणे

मराठा आंदोलनात घुसखोरी, मध्य प्रदेशच्या तरूणाला मराठ्यांनी पकडले अन्...

Maratha Protesters: मराठा आंदोलनादरम्यान मध्य प्रदेशातील तरुण पकडला. भगवा उपरणं घालून फिरत असल्याने आंदोलकांना संशय. आंदोलकांनी पोलिसांच्या स्वाधीन केला.

Bhagyashree Kamble

  • मराठा आंदोलनादरम्यान मध्य प्रदेशातील तरुण पकडला.

  • भगवा उपरणं घालून फिरत असल्याने आंदोलकांना संशय.

  • आंदोलकांनी पोलिसांच्या स्वाधीन केला.

  • आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप.

मध्य प्रदेशमधून आलेल्या एका तरुणाला मराठ्यांनी पकडले आहे. मध्य प्रदेशातून आलेला हिंदी भाषिक तरुण गळयात भगव्या रंगाचा उपरणं घालून फिरत होता. मराठा बांधवांना संशय येताच त्यांनी तरूणाची विचारपूस केली. तसेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी लोक आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणत आहेत, असा आंदोलकांचा आरोप आहे.

एक मराठा लाख मराठा म्हणत राज्यभरातून मराठा बांधव मुबंईत एकत्र जमले आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी हाती घेतला आहे. आझाद मैदानासह दक्षिण मुंबईत मराठा बांधवांमुळे वातावरण भगवामय झालंय. कोर्टानं आणि पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनंतरही मराठा आंदोलकांमधील आरक्षणासाठी असणारा जोर कायम आहे.

मात्र, मराठा आंदोलनादरम्यान, मराठा बांधवांनी एका परप्रांतियाला पकडलं. हा परप्रांतिय मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो भगव्या रंगाचं उपरणं घालून फिरत होता. मराठा बांधवांना तरूणाचा संशय आला. त्यांनी तरूणाची विचारपूस केली. तरूण परप्रांतिय असल्याचं समजताच मराठा बांधवांनी त्याला पकडले.

मराठा बांधवांनी परप्रांतिय तरूणाला पकडून थेट मुंबई पोलिसांकडे नेले. तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी परप्रांतिय लोक मराठा आंदोलनात अनुचित प्रकार घडवून आणतात, असं यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. सध्या याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

Manoj jarange patil protest live updates: मंचरमध्ये एकमेकाला लाडू भरवून मराठा आंदोलकांनी साजरा केला आनंदोत्सव

Frequent Urination: आरोग्याचा इशारा! ही सात लक्षणे टाळू नका, योग्य तपासणी लगेचच करा

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

Horoscope Wednesday : ४ राशींसाठी बुधवार जाणार खास, वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT