NIA, Palghar saam tv
मुंबई/पुणे

NIA Raids In Boisar : दहशतवाद्यांना मदत? एनआयएचा बाेईसरला छापा, तिघे चाैकशीच्या फे-यात

हमराजचे बोईसर येथे शालेय शिक्षण झाले.

रुपेश पाटील

National Investigation Agency : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बोईस येथे छापा टाकून तीन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिघांची प्राथमिक चौकशी करून पुढील चौकशीसाठी बंगळूर येथे हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (Maharashtra News)

दहशतवादी आणि हिंसाचारात सहभागी होण्यासाठी भारतीय तरुणांना कट्टरपंथीय बनवण्याच्या प्रकरणाच्या संदर्भात फेब्रुवारीत पालघर आणि बंगळुरू येथून दोन युवकांना अटक करण्यात आली होती.

हमराज शेख आणि बंगळुरूमधून मोहम्मद आरिफ अशी संशयितांची नावे आहेत. या दाेघांनी इतर युवकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी अल-कायदाच्या क्रियाकलापांशी संबंधित प्रकरणात अफगाणिस्तानला जाण्यासाठी विस्तृत व्यवस्था केली होती असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

आता एनआयएने पालघरनजीकच्या बोईसर येथे आणखी तीन संशयितांच्या घरांवर छापे टाकले. हे छापे अवध नगर आणि आझाद नगर या परिसरात टाकल्याची चर्चा आहे. या छाप्यात एनआयएने त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. त्यांना पुढील चाैकशीसाठी एनआयएने बंगळुरू येथील कार्यालयात बोलावले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT