Sushma Andhare On Nilam Gorhe Saam TV
मुंबई/पुणे

Sushma Andhare On Nilam Gorhe : सटर-फटर शब्दावरुन नीलम गोऱ्हेंना शाब्दिक शालजोडे, सुषमा अंंधारेंनी नेमकं काय म्हटलं...

Political News : सटर-फटर हा शब्द पकडून सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिलीप कांबळे

Mumbai News : उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधानपरिषद आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेना शिंदे गटात सामील झाल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यामुळे तुम्ही पक्ष सोडताय का? या प्रश्नावर नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, सटर फटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही.

सटर-फटर हा शब्द पकडून सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे  यांच्यावर निशाणा साधला आहे. नीलम गोऱ्हे मुरब्बी आणि धोरणी नेत्या आहे. त्यामुळे त्या सहजासहजी पोटातली गोष्ट ओठावर आणतील, असं वाटत नाही. हा कसोटीचा काळ आहे. मात्र पक्ष सोडताना त्या जे कारण देत आहेत ते पटणारं नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

मी ताईंचे आभार मानते, त्या खरंच सटरफटर लोकांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्या ज्या भागात राहतात तिथे शिवसेनेचा साधा एक नगरसेवक त्यांना निवडून आणता आला नाही. मात्र हेच सटरफटर लोक जीवाचं रान करतात आणि आमदार निवडून देतात. आणि या आमदारांच्या संख्येवर विधानपरिषदेचा आमदार ठरत असतो. पक्षप्रवेश करताना एक तरी विश्वासाचा माणूस सोबत नाही. म्हणजे तुम्हाला एकही माणून कमवता आला नाही, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.

मागील सहा महिन्यापासून तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा होती. तुमच्याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष होतं. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुणासाठी थांबणार नाही. तुम्हाला भावी आरोग्यमंत्री पदासाठी आधीच शुभेच्छा देते.

बुलढाणा येथे झालेला शेतकरी मेळावा, त्यानंतर नीलमताई पक्षाकडे फिरकल्याच नाहीत. त्या अधिवेशनातही आमच्या नेत्यांना बोलू देत नव्हत्या. आता त्यांचा कल तिकडेच होता, तर मग थांबवायचा विषय उरत नाही, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT