Omraje Nimbalkar update 
मुंबई/पुणे

पुण्यात 'ते' चार्टर विमान उतरलं अन्...; खासदार ओमराजेंच्या 'त्या' गुप्त प्रवासावर ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Omraje Nimbalkar update : सुषमा अंधारे यांनी पुण्यात उतरलेल्या चार्टर विमानाचा उल्लेख करत ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांबाबत गंभीर आरोप केले आहेत. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Omraje Nimbalkar latest news, Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "भाजपने प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करून गट तयार करायचा आणि त्यांच्याकडून भाजपला व डी-लिमिटेशनला पाठिंबा मिळवायचा, असा प्लॅन आखला आहे," असा थेट आरोप अंधारे यांनी केला आहे.

'साम, दाम, दंड, भेद' आणि आर्थिक आमिषे

सुषमा अंधारे यांनी भाजपवर सूडाचे राजकारण करत असल्याचा निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "भाजप सध्या सूडाने पेटलेले आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. ममता बॅनर्जी किंवा शरद पवार यांची काय चूक होती? त्यांची चूक एवढीच होती की ते स्वतःची प्रादेशिक अस्मिता जपत होते. पण ज्यांना स्वार्थ नडला आहे, त्यांना 'आमच्याकडे आलात तर फंड कमी पडू देणार नाही, निधी उपलब्ध करून देऊ' अशी आर्थिक आमिषे दाखवली जात आहेत आणि स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे."

'त्या' चार्टर विमानाचा गूढ काय? तानाजी सावंतांवर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर नेमके कुठे आहेत? याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम होता. यावर पडदा उचलताना सुषमा अंधारे यांनी पुण्यात आलेल्या एका चार्टर विमानाचा उल्लेख केला. "काल रात्री पुण्यात एक चार्टर विमान आलं, ज्याचे लीड तानाजी सावंत करत होते. या विमानामध्ये नानासाहेब पाटील, अमित शिरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे लोक होते. देवाच्या आणि कुटुंबाच्या शपथा घेणारे आता पक्ष नेतृत्वाची परवा करत नाहीत," असा घणाघात अंधारेंनी केला.

ओमराजेंच्या 'त्या' केसचा निकाल आणि आश्वासनांची चर्चा

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधताना अंधारे यांनी एका कोर्ट केसचा दाखला दिला. "ओमराजेंच्या एका केसचा निकाल येत्या २० तारखेला येणार आहे. त्या निकालाबाबत त्यांना काही आश्वासन देण्यात आले आहे का? किंवा 'तुमच्या राजकीय विरोधकांना संपवून टाकू' असा काही शब्द त्यांना मिळाला आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय देशमुख 'कॅप्टन', तर नागेश पाटील 'उपकॅप्टन'

या संपूर्ण घडामोडींमागे एका विशेष टीमचा हात असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. "या टीमचा कॅप्टन संजय देशमुख आणि उपकॅप्टन नागेश पाटील आष्टीकर आहेत. नागेश पाटील आष्टीकर यांना वाटत आहे की ते सर्वात मोठे तीस मार खान आहेत, पण त्यांच्या जीवनावरील पार्ट्या कुठे झाल्या, याची सर्व माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, काल सकाळीच नागेश पाटील यांनी श्रेष्ठींना फोन करून 'मला मदत करा' अशी विनंती केली होती," असा गौप्यस्फोटही सुषमा अंधारे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT