sushma andhare criticizes kapil patil in shahapur saam tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare : ...तर भाजपनं गौतमी पाटीलला उमेदवारी द्यावी, सुषमा अंधारेंची काेपरखळी (VIDEO)

Bhiwandi Politics : कपिल पाटील यांना पंचायत राज खात्याचा उपयोग करता आला नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गट नेत्या सुषमा अंधारेंनी केली.

Siddharth Latkar

फय्याज शेख, साम प्रतिनिधी, शहापूर

Shahapur News :

कपिल पाटील (kapil patil) यांच्या सभेला गर्दी जमत नाही म्हणून नृत्यांगणा गौतमी पाटील (gautami patil) यांना बोलवावे लागते. त्यांचा कार्यक्रम ठेवावा लागताे असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गट नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी शहापूर (shahapur) येथील मुक्त संवाद यात्रेदरम्यान (mukt samvad yatra) लगावला. भाजपने आता गाैतमी पाटील हिलाच उमेदवारी द्यावी, असा चिमटाही त्यांनी काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुषमा अंधारे म्हणाल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात (bhiwandi lok sabha constituency) 13 छोटी तर शहापूर तालुक्यात चार मोठी धरणे आहेत. तरी देखील अद्याप येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

येथील रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. या प्रश्नां संदर्भात कपील पाटील यांना विचारावे म्हटलं तर त्यांना आपल्यासाठी वेळ काेठे आहे. पंचायत राज संबंधित त्यांना खातं दिले मात्र त्याचा उपयोग त्यांना करता आला नाही अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. (Maharashtra News)

आता कपील पाटील यांच्या लक्षात आले आहे की आपण गर्दी जमवू शकत नाही. कारण गर्दी गद्दारांकडे येत नाही तर निष्ठांवतांकडे जाते. मग त्यांनी एक शक्कल लढवली. नृत्यांगणा गाैतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवला. गर्दी जमविण्यासाठी कपील पाटील यांना गाैतमी पाटील हिला बाेलवावे लागत असेल तर भाजपने गाैतमी पाटील हिला उमेदवारी द्यावी असेही अंधारेंनी नमूद केले.

त्या म्हणाल्या मग गाैतमी पाटील म्हणेल पाटलाचा बैलगाडा अन् शिंदे-फडणवीसांनी केलाय महाराष्ट्रात राडा. सगळा राजकाराणाचा चिखल झाला आहे असेही अंधारे यांनी म्हटलं

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT