Sushma Andhare  Saam TV
मुंबई/पुणे

Sushma Andhare: 'कणखर बाणा गळून पडलाय, मनाची घालमेल होतेय...' सुषमा अंधारेंची भावूक पोस्ट व्हायरल; नेमकं काय घडलं?

Sushma Andhare's Emotional Post: राजकारणात सक्रीय असलेल्या सुषमा अंधारे आपली आई म्हणूनही भूमिका चोख बजावतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sushma Andhare Viral Post: ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे भाषणाला उठल्या की भलभल्यांचं धाबं दणाणतं. सुषमा अंधारे बोलू लागल्या की त्यांच्या निशाण्यावर आज कोण असा प्रश्न पडू लागतो. राजकारणात कणकर असलेल्या सुषमा अंधारे यांची हळवी बाजू म्हणजे त्यांची मुलगी. (Political News)

राजकारणात सक्रीय असलेल्या सुषमा अंधारे आपली आई म्हणूनही भूमिका चोख बजावतात. मात्र पूर्णवेळ राजकारणात असल्याने आपल्या चिमुकलीसाठी वेळ काढण्यासाठी अंधारेंना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण आपल्या लेकीच्या वाढदिवशीही त्यांना वेळेत घरी पोहोचता आलं नाही. याबाबत त्यांनी आपल्या चिमुकलीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. (Latest News)

या पोस्टमध्ये आपल्या लेकीच्या वाढदिवसासाठी वेळेत घरी पोहोचण्यासाठी त्यांना किती आणि कसे प्रयत्न करावे लागले याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते, हे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.

सुषमा अंधारेंची पोस्ट जशीच्यातशी

शिवगर्जना सप्ताहाच्या सलग सभा सुरु आहेत. वरळीची सभा संपवून वायुवेगाने मन लेकीकडे धावतंय. पण लोणावळा घाटातील ट्रॅफिक जणू माझा रस्ता अडवून थांबलंय. दीड-दोन तासांपूर्वीचा कणखर लढावू बाणा गळून पडलाय. समोरची अजस्त्र वाहनांची अस्ताव्यस्त ट्रॅफिक बघून "पराधीन जगती पुत्र मानवाचा " या ओळींची यथार्थता अनुभवतेय.

12 वाजलेत.... लेकीचा वाढदिवस आहे. आता या क्षणाला मी तिच्यासोबत असायला हवं. अर्थात नसले तरी रुसण्या इतकं फुरंगटून बसण्या इतकं कळतं वय तरी कुठे आहे म्हणा? पण जो वसा हातात घेतलाय तोही तितकाच महत्वाचा!

आता जी मनाची घालमेल होतेय ती कदाचीत फक्त रुपाली पाटील ठोंबरे ही मैत्रिणच समजू शकेल. कारण 11 फेब्रुवारीला तिच्या विरूचा वाढदिवस होता. कब्बुपेक्षा फक्त 16 दिवसांनी मोठा आहे तो. अन् त्याच्या वाढदिवसाला इच्छा असूनही कामामुळे रूपाली पोहोचू शकत नव्हती. वरुन कितीही खमकेपणा दाखवला तरी त्यादिवशी फ्लाईटमध्ये तिचा रडवेला चेहरा अन् आरक्त डोळे तिच्यातल्या व्याकूळ आईचं काळीज डोकावत होतं.

असो भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. याक्षणी शिवसैनिकांनी रक्ताच पाणी करुन वाढवलेली शिवसेना बेइमानांच्या कपटजालात अडकली आहे ती सोडवलीच पाहिजे. लेकीचा वाढदिवसासाठी शिवसैनिक मामा शहरप्रमुख आनंद गोयल, गजानन थरकुडे, निलेश जठार, अक्षय मालकर हे सगळे आहेतच. त्यामुळे फिकर नॉट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT