सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर ! संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार... Saam Tv
मुंबई/पुणे

सुप्रिया सुळे लोकसभेत १ नंबर ! संसदेत ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार...

लोकसभेत खासदार म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्याने सुप्रिया सुळे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या तथा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या लोकसभेत नंबर वन खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदार म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. पीआरएस लिगेस्टिव्ह रिसर्च (PRS Legislative Research) ही संस्था संसदेतील खासदारांच्या कामगिरीवर लक्ष ठेवत अहवाल प्रसिद्ध करत असते. त्यानुसार यंदा लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं नाव पुढे आलं आहे. (Supriya Sule No. 1 in Lok Sabha! The best MPs in Parliament)

हे देखील पहा -

पीआरएस संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार, लोकसभा अधिवेशनामध्ये खासदार किती वेळा उपस्थितीत राहिले? किती प्रश्न विचारले? चर्चेंमध्ये सहभाग खासगी विधेयके आदींचा या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha) सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या, त्यामुळे त्या अव्वल ठरल्या आहे. 17 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे 91 टक्के उपस्थित होत्या. तर १५९ चर्चासत्रात त्या सहभागी झाल्या होत्या. याशिवाय सुमारे ३८३ प्रश्न त्यांनी विचारले आणि 7 खाजगी विधेयकं त्यांनी मांडली. त्यांच्या या प्रशस्त कामगिरीमुळे त्या लोकसभेत अव्वल ठरल्या आहेत.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया:

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं की, "आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता, राष्ट्रवादी पक्ष, सहयोगी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देते." असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.


Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT