जागतिक महिलादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करत मोदींनी देशभरातील महिलांना खास भेट दिली. यावरून राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपला चांगलाच टोला हाणला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"निवडणुका जवळ आल्या की असे 'जुमले' पाहायला मिळतात. ही तर सुरुवात आहे, पिच्चर अभी बाकी आहे. अजून खूप काही घोषणा होणे बाकी आहे. आगे-आगे देखो होता है क्या", असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. त्या पुणे येथे बोलत होत्या.
इतके वर्ष जेव्हा गॅस सिलिंडरच्या किमती १००० रुपये होत्या. त्यावेळी महिला रडत होत्या. तेव्हा सिलिंडरच्या दरात कपात करण्याचं यांना का सूचलं नाही? लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की लगेच १०० रुपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. (Latest Marathi News)
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गॅस सिलिंडरच्या दरात फक्त १०० रुपयांची कपात करून काय होणार आहे. गॅसचे दर ४०० रुपये करून दाखवा, असं चॅलेंज देखील सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपला दिलं.
आज महिला दिन असल्याने आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.