बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दत्ता भरणे यांचा हा दमदाटीचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. दत्ता भरणे यांच्या दमदाटीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यानंतर बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्यानंतर बारामतीमधील राजकीय वातावरण पेटलं आहे. रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ समोर आणला. दत्ता भरणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या गवळी नावाच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली. भरणे यांनी मतदान केंद्रावर या कार्यकर्त्याला दमदाटी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली.
या तक्रारीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासमधील गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सुळे यांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मी दोन कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, असं स्पष्टीकरण भरणे यांनी दिलं.
दरम्यान , बुथमधील नाना गवळी या कार्यकर्त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी एक मतदार म्हणून काम करताना दत्ता भरणे यांनी अपशब्द वापरले. तुला गावात राहायचे का नाही, तुला कोण काय करणार आहे? तू कोण या लोकांना सांभाळणार आहे... गेल्या १५ दिवसांपासून फोनवरून धमक्या सुरु आहेत, असा आरोप गवळी यांनी दिला.
'गेल्या अनेक दिवसांपासून अशी भाषा वापरत आहेत. बुथमध्ये स्लिप वाटताना त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची संस्कृती म्हणून त्यांचा मानसन्मान राखतो. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोठ्या लोकांचा आदर करण्यास सांगितलं आहे, असे गवळी यांनी सांगितले.
या घटनेनंतर या कार्यकर्त्याची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यावेळी गवळी यांनी संपूर्ण प्रकार सुप्रिया सुळे यांना सांगितला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.