Supriya Sule news  Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणी टिंगरेंची शरद पवारांना नोटीस, सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे केला आहे. पुण्यातील वडगाव शेरीत सुळे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे एका व्यक्तीने शरद पवारांना नोटीस पाठवल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा सुरु आहे. या सभेला सुप्रिया सुळे यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा उपस्थितीत आहेत. या सभेत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली.

सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील मुद्दे

आम्ही मागच्या वर्षी वेगळ्या व्यक्तीसाठी तिकीट मागितलं. ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे. तुम्हाला त्या व्यक्तीने काय केलं, माहिती आहे.

पोलीस ठाण्यात कुठल्या मोठा नेत्याचा फोन आला? हा आरोप आम्ही सगळ्यांनी केला. त्या व्यक्तीने शरद पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणी माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचील, अशा नोटीस शरद पवारांना पाठवली.

शरद पवार ईडी नोटीसला घाबरत नाही, तुमच्या नोटीसला काय घाबरणार?

बापू, तुम्ही मला शब्द द्या, कुठलाही अपघात झाला, तर तुम्ही पोलीस ठाण्यात नाही हॉस्पिटलमध्ये आधी जाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT