Pegasus Spyaware केंद्राचा प्रतिज्ञापत्रास नकार- न्यायालयाने निकाल राखून ठेवला
Pegasus Spyaware केंद्राचा प्रतिज्ञापत्रास नकार- न्यायालयाने निकाल राखून ठेवला Saam Tv
मुंबई/पुणे

Pegasus Spyaware केंद्राचा प्रतिज्ञापत्रास नकार- न्यायालयाने निकाल राखून ठेवला

विहंग ठाकूर

पेगासेस स्पायवेअरच्या वापरावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केंद्राने नकार दर्शवल्याने सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court पेगासस प्रकरणांवर अंतरिम आदेश राखून ठेवला. दोन तीन दिवसांत या बाबत सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. पेगाससवरील सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले की, आम्ही सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही, आम्ही निष्पक्ष लोकांची समिती स्थापन करू, ज्यात सरकारी लोकांचा समावेश नसेल. या प्रकरणी सरकारने आतापर्यंत काय केले हे जाणून घ्यायचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हे देखील पहा -

यासह, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले की या प्रकरणात प्रतिज्ञापत्र का दाखल केले नाही? न्यायालयाच्या प्रश्नांवर सरकारने म्हटले की, आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही त्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करू शकत नाही. सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, 'प्रतिज्ञापत्राद्वारे या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही. प्रतिज्ञापत्र दाखल करणे आणि नंतर ते सार्वजनिक करणे शक्य नाही.

यानंतर सरन्यायाधीश रामण्णा म्हणाले की, जर सरकारने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही तर न्यायालयाला या प्रकरणी आपला आदेश द्यावा लागेल. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेनंतर न्यायालयाने अंतरिम आदेश राखून ठेवला. केंद्राने स्पष्टपणे सांगितले की आम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरतो हे जाणून घेण्याची दहशतवाद्यांना संधी देऊ शकत नाही. यावर, न्यायालयाने सरकारशी असहमती दर्शवली आणि म्हटले की आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा समजते आणि सरकारला यावर काही सांगण्याची गरज नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT