Nana Patole on Devendra Fadnavis, Nana Patole latest marathi news, OBC Reservation latest News
Nana Patole on Devendra Fadnavis, Nana Patole latest marathi news, OBC Reservation latest News Saam TV
मुंबई/पुणे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फडणवीसांचा खोटारडेपणा उघड; नाना पटोलेंचे टीकास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC REservation) घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) खोटारडेपणा उघड झाला असून भाजपाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (Nana Patole on Devendra Fadnavis)

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हे आरक्षणविरोधी आहेत. मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते त्यावेळी त्याला विरोध करत भाजपने कमंडल यात्रा काढली होती. केंद्रातील भाजप सरकारने इम्पिरीकल डेटा न दिल्यामुळेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार मागणी करूनही केंद्र सरकारने डेटा दिला नाही त्यामुळेच ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण गेले. याला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचंही पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्ष सत्तेत असताना आरक्षण वाचविण्यासाठी काहीही केले नाही. भारतीय जनता पक्षाला फक्त ओबीसी समाजाची मते हवी आहेत. ओबीसींनी आरक्षण किंवा शासकीय योजनांचा लाभ द्यायचा नाही. भाजपला खरेच ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत बहाल करावे असंही पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

Today's Marathi News Live: पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT