Palghar News saam tv
मुंबई/पुणे

Palghar Talasari Hospital Viral Video: पालघरला मांत्रिकाकडून ग्रामीण रुग्णालयात उपचार, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार?

दरम्यान रुग्णालय व्यवस्थापनाच्या कानी हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितास विराेध केला.

रुपेश पाटील

Palghar News : देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण दुसऱ्या बाजूला मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे. सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल हाेत आहे.

तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोमा लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

या रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात रेफर करण्यात आल आहे. थेट रुग्णालयातच अशा पद्धतीने अंधश्रद्धेतून अघोरी विद्येचा प्रयोग झाल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

दरम्यान रुग्णालय (hospital) व्यवस्थापनाच्या कानी हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितास विराेध केला. परंतु ताेपर्यंत वेळ निघून गेली हाेती. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन पाेलिसांत तक्रार देणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT