Sujat Ambedkar
Sujat Ambedkar  Saam Tv
मुंबई/पुणे

'शरद पवारांबद्दलची फेसबुक पोस्ट अतिशय घाणेरडी आणि चुकीची' : सुजात आंबेडकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. त्यात अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale ) हिने केलेलं फेसबुक पोस्ट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी आज (रविवारी) सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा जागर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Sujat Ambedkar reaction on ketaki chitale' facebook post )

हे देखील पाहा -

सुजात आंबेडर म्हणाले, 'सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले. 'शरद पवार यांना महाराष्ट्रभर आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य शोभनीय नव्हतं. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार (Sharad Pawar) हे प्रेरणा आहेत, कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटत, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे', असंही सुजात आंबेडकर म्हणाले. 'आमच्याकडे अंबानी-अदानी इतका पैसा नसेल, पण प्रबुद्ध भारत माध्यमाकडे सक्षम लोकं आहेत. त्यामुळं वंचित समाजासाठी प्रभावी माध्यम समोर घेऊन येऊ शकतो, असा आशावाद देखील आंबेडकरांनी व्यक्त केला.

दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं. मीडियाचा नॅरेटिव्ह योग्य हवा. दोन पक्षांच्या भांडणात समाजाकडे दुर्लक्ष होत असून समाजाचे प्रश्न मांडणं महत्त्वाचं आहे. सुशांत सिंग, कंगना राणावत प्रकरणात कोरोना, रेमडेसिवीर या प्रश्नांकडे माध्यमाचं दुर्लक्ष झाल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. अंबानी अदानी इतका पैसा नसून त्यासाठीच प्रबुद्ध भारतसारखं माध्यम आपल्या हातात हवं. हीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी देखील सांगितली होती. त्यामुळं समाजासाठी मीडियाचा नॅरेटिव्ह तितकाच महत्वाचं असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

Tamannaah Bhatia : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Today's Marathi News Live : पीएम मोदींची पुण्यात सभा, चारही उमेदवार राहणार उपस्थित

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Maharashtra Election News | महायुतीच्या प्रचाराकडे छगन भुजबळांची पाठ? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?

SCROLL FOR NEXT