Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

ऊसाचं गाळप होणार, शेतकऱ्यांंनी टोकाची भूमिका घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

'शेतकऱ्यांनी घाबरु नये, सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठी नेणार असून त्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : शेतकऱ्यांनी घाबरु नये, सर्व ऊस गाळप करण्यासाठी नेणार असून, त्यासाठी यंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, ऊसाचं काय होणार याची चिंता आहे, मे महिन्यात रिकवरी लॉस दिला आहे. तरी बीडमध्ये (Beed) दुःखद घटना घडली, शेतकऱ्याने आत्महत्या केली. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. ऊस संपवायला युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत तरी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं.

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरती (OBC Reservation) देखील भाष्य केलं. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करा असं सांगितलं आहे. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. असही ते यावेळी म्हणाले. तसंच राजद्रोह कलम सुप्रीम कोर्टाने सांगितल कलम वापरू नये. संविधानात ज्या काही यंत्रणा अधिकार दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन होईल असं त्यांनी राणा यांच्या कारवाईबाबत भाष्य केलं.

दरम्यान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार मुंबईत कार्यालय काढणार यावर बोलताना पवार म्हणाले, कोणी कुठे कार्यालय काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. दिल्लीत सर्व राज्यांचे सदन आहेत, महाराष्ट्रात तर भारतातून अनेक जण येतात. आम्हाला वाटल तर आम्ही पण उत्तर प्रदेश मध्ये कार्यालय काढू. भारतात कोणाला कुठेही कार्यालय काढता येतात यातून वेगळ्या प्रकारचं प्रचार प्रसार करू नये असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT