धक्कादायक ! निलगायीची हत्या करुन पार्टी; आरोपींवर कारवाईसाठी भाजप आक्रमक

निलगाईची हत्या एका इफ्तार पार्टीसाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
Nanded Crime
Nanded CrimeSaam TV

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) निलगायीची हत्या करुन मेजवानी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या निलगाईची बंदुकीने गोळी झाडून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. भाजप (BJP) पदाधिकारी आणि प्राणिमित्रांनी हे प्रकरण उचलून धरलं असून निलगायीच्या हत्येमागे राजकीय व्यक्ती असल्याची चर्चा सुरु आहे.

मुदखेड तालुक्यातील वाई येथील जंगलात (Forest) बंदुकीने गोळी झाडून निल गाईची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर या निलगायीच्या मासांवर अनेकांनी ताव मारला असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक करुन निलगायीचं मासं जप्त केलं आहे.

Nanded Crime
१६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, गरोदर राहिल्याचं कळताच प्रियकराने तिला सोडलं

दरम्यान, निलगायीची हत्या करुन पार्टी करण्यामागे राजकीय हात असल्यामुळे हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे. तसंच निलगायीची हत्या एका इफ्तार पार्टीसाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही साले यांनी केला आहे. दरम्यान, भाजपचं एक शिष्टमंडळ उपवनसंरक्षकांना भेटून निलगाईची हत्या करुन पार्टी करणाऱ्यां मूख्यसुत्रधारां विरोधात वन्यजीव कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आधीच जंगलातील दुर्मिळ प्राणी नष्ट होत असताना. प्राण्यांची निघृणपणे हत्या करुन त्याची मेजवाणी केली जातेय. त्यामुळे नांदेडमध्ये निलगायीची हत्या करणाऱ्यां मुख्यसुत्रधारावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com