शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला - सुधीर मुनगंटीवार Saam Tv
मुंबई/पुणे

शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला - सुधीर मुनगंटीवार

बाबासाहेब पुरंदरे कायम स्मरणात राहतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर लाखोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे कायम स्मरणात राहतील.

हे देखील पहा -

शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साहाय्याने वन्ही तो चेतवावा , चेतविता चेततो या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ बाबासाहेबांनी दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा हे बाबासाहेबांचे बलस्थान . या बलस्थानाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रासह अवघे विश्व जिंकले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणारे बाबासाहेब आमचा मानबिंदू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Momos Health Risk: मोमोज खाणं आरोग्यासाठी धोक्याचं, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, राजस्थान रॉयल्स संघाचे सामने पुण्यात होण्याची शक्यता

Accident : क्षणात होत्याचं नव्हतं, प्रवाशांनी भरलेल्या दोन बसची समोरासमोर धडक; ६ प्रवाशांचा मृत्यू

मेंदूच्या नसा कमकुवत झाल्या की शरीर देतं हे संकेत

Gauri Garje Case: 'श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या', डॉक्टर गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT