PMP strike  Saam Tv
मुंबई/पुणे

प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी पुण्यात पीएमपी ठेकेदारांचा अचानक संप

700 खासगी बसची वाहतूक थांबली ;ठेकेदारांवर 'मेस्मा' नुसार कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी आज सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. त्यामुळे पीएमपीच्या (PMP) ताफ्यातील सुमारे ६०० बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे (transporters) म्हणणं आहे, तर हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. मात्र, या संपामुळे प्रवाशांचे (passengers) नुकसान होत आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस (Notice) पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे. पीएमपीमध्ये सुमारे ७ खाजगी ठेकेदारांच्या ९५६ बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे ६५० ते ७०० बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली. याविषयी एका खाजगी (Private) ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या ८ महिन्यांची १०७ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याविषयी हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पीएमपीच्या सह व्यवस्थापिका संचालक डॉ. चेतन केरुरे म्हणाल्या की ठेकेदारांना गुरुवारी ५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. संप करण्याचे वेगळेच कारण आहे, ठेकेदारांकडून बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा निधी दिला जात नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आले होते. त्याची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत भरण्याचा त्यांना आदेश देण्यात आला आहे. तसेच याविषयी प्रशासनाने पडताळणी ही सुरू केली आहे, त्याचा राग येऊन हा संप झाला असावा, असे वाटते. परंतु, प्रशासनाने पीएमपीच्या १२०० पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच संपर्क करणाऱ्या ठेकेदारांना अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT