KDMC ने लावलेल्या सीसीटीव्हीचा असाही फायदा प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC ने लावलेल्या सीसीटीव्हीचा असाही फायदा

एका रिक्षाचालकाने प्रवाश्यास लुटले मात्र, CCTV कॅमेऱ्यामध्ये हि रिक्षा कैद झाल्याने कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी केवळ १६ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण शहरातील आकाश जयस्वाल नावाचा एक कारपेंटर काम संपल्यानंतर कल्याणमधील निक्कीनगर परिसरातील चौकात उभा होता. रात्रीचे साधारणतः साडेआठ वाजले होते, त्याला कल्याण स्टेशनला काही कामानिमित्त जायचे होते. दरम्यान तिथे एक रिक्षा आली, रिक्षा चालकाने आकाशला रेल्वे स्टेशनला जायचे आहे का? असे विचारले. त्यावेळी आकाशने रिक्षा चालकास होकार दिला.

हे देखील पहा -

हा युवक त्या रिक्षात बसला मात्र, या रिक्षात आधीपासूनच एक प्रवासी देखील बसला होता. रिक्षा थोड्या अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्नस्थळी थांबवली व रिक्षातील त्या दोघांनी आकाश जवळील महागडा मोबाईल आणि रोकड हिसकावली व त्याला रिक्षाबाहेर ढकलून दिले व चालक आणि रिक्षातील दुसरा प्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावलेल्या सीटीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हि रिक्षा कैद झाली होती.

या रिक्षाचा पडदा हा निळ्या रंगाचा आहे. कल्याण डोंबिवलीत अश्या पद्धतीची रिक्षा कधी आढळून आली नसल्याने, कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या पथकाने या रिक्षाचा शोध सुरु करून केवळ १६ तासांच्या आत आकाश जयस्वाल या तरुणास लुटणाऱ्या रिक्षाचा तपस लावला. या रिक्षाचालकाचे नाव अक्षय कांबळे असून रिक्षात आधीपासूनच उपस्थित असलेल्या प्रवाश्याचे नाव रशीद शेख असून या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघेही आरोपी कल्याण पूर्व भागातील श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT