Uday Samant sarcasm on Nagar Panchayat Election Results
Uday Samant sarcasm on Nagar Panchayat Election Results Saam Tv
मुंबई/पुणे

Nagar Panchayat Election: यश आणि अपयश पचवता आलं पाहिजे- उदय सामंतांचा भाजपला टोला

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नगरपंचायत निवडणुका (Nagar Panchayat Election) निकाल हाती आल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर आलेले बघायला मिळाले. अशातच यश आणि अपयश पचवता आलं पाहिजे असा टोला उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजपला लगावला आहे. शिवाय महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले आहे. (Success and failure should be digested- Uday Samant sarcasm to BJP)

हे देखील पहा -

उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सिंधुदुर्गला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. नव्या आलेल्या भाजप नेत्यांचा तो बालेकिल्ला होता. 17 चे 17 सदस्य भाजपचे होते तिथे 7 शिवसेनेचे निवडून आले. दीपक केसरकर, वैभव नाईक, विनायक राऊत यांचे हे यश आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळवले. पोलादपूर, माणगांव शिवसेनेकडे आली, 2 राष्ट्रवाडीकडे गेल्या. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. त्याचप्रमाणे मविआला मोठं यश मिळालं आहे. एकहाती भाजप विजयाचा जो शब्द प्रयोग होतो त्याला विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

जिल्हा बँक निवडणूक वेळी वेगळं वातावरण केलं होतं, पण आता जनतेने शिवसेनेला यश दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामाची ही पोचपावती असून लोकांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केलं आहे असंही सामंत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, भविष्यातील सर्व ठिकाणी शिवसेनेला यश मिळालं, कोकणात तसं भाजपला काही मिळालं नाही. तिन्ही पक्षाचे एकत्र केले तर 20 टक्के भाजपला यश आहे. भाजपचे अपयश पहाता लोकांना इतर पक्षात जाण्यासाठी थांबवण्यासाठी भाजपचे लोक सध्या बरीच वक्तव्यं करतात असंही ते म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

SCROLL FOR NEXT