Construction Saam Tv
मुंबई/पुणे

Metro Subway: १०० कोटींचा खर्च, ३०६ मीटर लांबी; मंत्रालय-विधान भवन जोडणारा सबवे पुढच्या वर्षी खुला होणार

Mantralaya-Vidhan Bhavan Subway: मंत्रालय, विधान भवनासह अन्य शासकीय इमारतींना जोडणारा हा बोगदा विधान भवन मेट्रो ३ स्थानकाजवळ असेल. याचे काम मे-जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

Saam Tv

Mantralaya-Vidhan Bhavan Subway: नरिमन पॉईंट परिसरात मंत्रालय, विधान भवन आणि अन्य काही प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो ३ स्थानकाशी जोडणाऱ्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. या बोगद्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ३०६ मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरसीएलला आहे.

चर्चगेट-नरिमन पॉईंट या भागात अनेक शासकीय इमारती, जागा आहेत. असंख्य सरकारी कर्मचारी दररोज कामानिमित्त येत असतात. सर्वसामान्यांसह मोठे पदाधिकारी, नेतेमंडळीही या परिसरात येत असतात. परिणामी या भागात गर्दी, वाहतुक कोंडी होत असते. या प्रश्नावर मात करण्यासाठी शासनाने मंत्रालय, विधान भवन यांसारख्या महत्त्वपूर्ण जागांना भूमिगत बोगद्याने (Underground Subway) जोडण्याचे ठरवले. याचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे देण्यात आले.

एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय-विधान भवन ते विधान भवन मेट्रो ३ स्थानकाला जोडणारा बोगदा जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. या बोगद्याची लांबी ३०६ मीटर असणार आहे. मंत्रालयाजवळ त्याची रुंदी १६ मीटर, तर इतर ठिकाणी त्याची रुंदी ९ मीटर असणार आहे. महत्त्वाच्या सरकारी इमारतींना जोडणारा हा बोगदा विधान भवन मेट्रो ३ स्थानकाजवळ उघडेल.

मंत्रालय, विधान भवन अशा कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी संवेदनशील होऊ काम करावे लागते. त्याचाही कामावर परिणाम झाला, असे एमएमआरसीएलच्या एल. के. गुप्ता यांनी सांगितले. त्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहितीही दिली. खोदकाम झाले असून मातीचा ढीग बाहेर काढण्याचे आणि बोगदा बांधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. या कामासाठी खास ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान असलेल्या मशिन्सचा वापर केला जात असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT