Maharashtra Police Bharati  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : पोलीस भरतीला पुण्यातून पहिला कडाडून विरोध, तरूण रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंही बोलले!

Aaditya Thackeray On Maharashtra Police Bharati 2024: राज्यात उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

महाराष्ट्र पोलीस दलासाठी होणारी भरती प्रक्रिया गेली कित्येक दिवसांपासून रखडली होती. परंतु अखेर भरती प्रक्रिया उद्यापासून १९ जूनपासून सुरु होत आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यी आंदोलन करत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटल्याचं दिसत आहे.

पोलीस भरती संदर्भात मार्च २०२३ मध्ये काढलेल्या जीआरमध्ये ४ महिने मुदत वाढ (Police Bharati 2024) करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. पोलीस शिपाई भरतीला एक संधी देण्यात यावी. मराठा प्रमानपत्र एसईबीसी न मिळल्याने आमचे अर्ज भरण्यात आले नाहीत, असा आरोप देखील विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वातावरण तापलेले दिसत आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र पोलीस दलासाठी होणारी कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरु होत (Aaditya Thackeray On Maharashtra Police Bharati 2024) आहे. महाराष्ट्रातले युवक या भरतीकडे अपेक्षेने पाहत असल्याचं त्यांनी म्हटलंय. १७,००० पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी पाणी, सावली आणि औषधांची सोय असायलाच हवी. वैद्यकीय यंत्रणा देखील चोख असायला हवी. वातावरणाची तीव्रता वाढल्यास तात्काळ भरती प्रक्रिया स्थगित करुन पुढील तारीख द्यायला (Maharashtra Police Recruitment) हवी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे युवक-युवतींना जरी कठोर परिक्षणातून जावं लागणार असलं तरी त्यात माणूसकी असावी, असं म्हणत त्यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या (Maharashtra Police) आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT