Deepak Kesarkar On Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

आता हे राजकारण थांबवा...; दीपक केसरकरांचा ठाकरेंना इशारा

'राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही?'

Jagdish Patil

मुंबई : मागील अडीच वर्षे दिल्लीवर आरोप सुरू होते आणि आता हे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना व त्यांच्या समर्थकांना दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. तेंव्हापासून शिंदे गटाची बाजू मांडणारे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती केले जाणारे आरोप सहन केले जाणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

मात्र, आता याच केसरकरांनी ठाकरेंनाच इशारा दिला आहे, आपल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले, 'त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी उठून केंद्र सरकारवर टीका करत होते. त्यामुळे केंद्रासोबत असलेले संबंध बिघडले. मागील अडीच वर्षे दिल्लीवर आरोप करण्याचे जे राजकारण सुरू होते. ते आता हे राजकारण थांबले पाहिजे. राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पाहा व्हिडीओ -

आमच्याबरोबर आलेल्या खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारला जातायत, लोकांना का भडकवत आहात, कालपर्यंत कुठेही न फिरणारे आता फिरू लागलेत, मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील कार्यालयात ते किती वेळा गेले आणि काय काम केले? बांधावर जा म्हणून सांगायचे. मग, आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा प्रश्न त्यांनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (Narendra Modi and Uddhav Thackeray) यांचे बोलणे सुरू होते. मात्र, १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हे बोलणे थांबले हे खरे आहे का, या प्रश्नासह ३ प्रश्न मी विचारले होते. मात्र, एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाहीत. आज ज्या काही भावना भडकावल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत, राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याला द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे असंही केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार ३००० रुपये, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

धोनीसोबतही असेच होतं... रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली कुणावर भडकला, मैदानावर नेमकं काय झालं?

MNC Election: संजय राऊतांची फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज, नेमकं कारण काय? | VIDEO

SCROLL FOR NEXT