एकविरा गडावर दरड कोसळली; सुदैवाने कोणीही जखमी नाही दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

एकविरा गडावर दरड कोसळली; सुदैवाने कोणीही जखमी नाही

मावळ मध्ये मुसळधार पावसामुळे कार्ला लेणीच्या डोंगरावरून काही दगड लेणी समोरील मोकळ्या जागेत पडले आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी नाही झाले नाही.

दिलीप कांबळे

पुणे: मावळ मध्ये मुसळधार पावसामुळे कार्ला लेणीच्या डोंगरावरून काही दगड लेणी समोरील मोकळ्या जागेत पडले आहेत. सुदैवाने यावेळी या परिसरात कोणी पर्यटक नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. (stone slide on Ekvira fort; Fortunately no one was injured)

हे देखील पहा -

दुपारच्या सुमारास कार्ला आणि लोणावळा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे डोंगर भागातून पाण्याचे मोठे लोट वाहू लागल्याने कार्ला एकविरा देवीच्या डोंगरावर सैल झालेले काही दगड पाण्यासोबत खाली आले. अतिशय वेगाने हे दगड खाली येऊन परिसरात पसरले आहेत. हे दगड पडताना जोराचे आवाज ही परिसरातून येत होते, कार्ला लेणी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. पर्यटकांची रोज येथे गर्दी होतीये. आज सुदैवाने या परिसरात कोणी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दोन महिन्यांपुर्वी देखील या डोंगरावरून तुटलेल्या भिंतीचे दगड मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत पडले होते.

यावर्षी दगड पडण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. परंतु वारंवार या घटना घडू नये यासाठी कार्ला गड पायथा येथील अशोक कुटे यांनी पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार करून देखील परिस्थिती आहे तशीच आहे. एका आठवड्यात संबधीत खात्याने लेणी, गडची डागडुजी नाही केली, तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT