Badlpaur Protest  Saam tv
मुंबई/पुणे

Badlpaur Protest: बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, धक्कादायक VIDEO

Vishal Gangurde

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून सुरु झालेलं आंदोलन चिघळलं आहे. रेल्वे रुळावर उतरलेल्या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा येथे जमला होता. त्यानंतर पोलिसांना बाजूला सारण्यासाठी आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेने पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

बदलापुरातील अत्याचार प्रकरणानंतर आंदोलकांनी मंगळवारी बंदची हाकची दिली होती. या घटनेचे पहाटे ६ वाजल्यापासून पडसाद उमटत होते. शहरातील सर्व दुकाने, रिक्षा बंद आहेत. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जमाव सकाळपासूनच शाळेच्या बाहेर जमला होता. शाळेबाहेर आंदोलन केल्यानंतर संपूर्ण जमाव रेल्वे स्टेशनजवळ जमा झाला. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांनी रेल्वेरोको केला. आंदोलकांनी मागील दोन तासांपासून रेल्वे रोको केला. काही तासांच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली.

आंदोलकांना बाजूला पांगवण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्जचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यावेळी आंदोलकांनी पाण्याच्या बॉटल फेकल्या आहेत. रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांच्या म्हणण्याला न जुमानता आंदोलकांनी आंदोलन सुरु ठेवलं. आंदोलकांच्या संतप्त भूमिकेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापुरातील नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याने १२ ऑगस्ट आमि १३ ऑगस्ट रोजी मुलीवर अत्याचार केले. या घटनेनंतर एक पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हती. यानंतर पीडित मुलीच्या आजोबाने रुग्णालयात नेऊ तिची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर नोंदवण्यास उशीर झाल्याने पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT