दुकानांवरील पाट्या मराठीत ठेवण्याच्या निर्णयात, सरकारने एक भानगड केलीय - राज ठाकरे
दुकानांवरील पाट्या मराठीत ठेवण्याच्या निर्णयात, सरकारने एक भानगड केलीय - राज ठाकरे Saam TV
मुंबई/पुणे

दुकानांवरील पाट्या मराठीत ठेवण्याच्या निर्णयात, सरकारने एक भानगड केलीय - राज ठाकरे

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या आता मराठीमध्ये (Marathi) लावण्याबाबत काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निर्णयामध्ये एक भानगड सरकारनं करून ठेवली असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत त्याबाबत त्यांनी एक पत्र लिहलं आहे. यावरुन आता मराठी भाषा फलकांच्या निर्णयावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं दिसून येत आहे.

याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एक पत्र लिहंल आहे या पत्रामध्ये त्यांनी लिहलं आहे की, 'ह्या महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी (MNS) महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील पाट्या मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे देखील हा -

निर्णयामध्ये सरकारनं एक भानगड केलीय -

दरम्यान त्यांनी महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन केलं आहे मात्र सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा असही त्यांनी पत्रात नमुद केल आहे. तसंच या निर्णयामध्ये एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच (Marathi) चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराच त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT