Narendra Modi
Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

देशाच्या विकासात महाराष्ट्राचं मोठं योगदान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Jagdish Patil

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना समर्पित 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज राजभवन येथे झालं. या कार्यक्रमा दरम्यान मोदी यांनी भाषण केलं. आपल्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रामधील क्रांतीरारकांचे कौतुक केलं, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना देशवासीयांना वटपौर्णिमा आणि संत कबीर यांच्या जयंतींच्या शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. (Inauguration of 'Kranti Gatha' underground gallery)

हे देखील पाहा-

ते म्हणाले, 'एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. ही वास्तु समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. हे महाराष्ट्र भवन अनेक लोकतांत्रिक घटनांसाठी साक्षीदार असून इथे इनेक संविधानिक पदाच्या शपथा घेतल्या आहेत. आता इथे जलभूषण भवन आणि क्रांतीगाथा गॅलरीचे उद्धाटन करण्यासाठी आलो असलो तरी याआधी पण राजभवनामध्ये (Raj Bhavan) आपण आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच या जुन्या इतिहासाला नवं रुप देताना आधुनिकतेला जपलं आहे. 'इथून ती जागा लांब नाही जेथून गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती.' असं मोदींनी सांगितलं. तसंच आता या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे कारण, देश सध्या आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक देशप्रेमी, स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करण्याचा हा दिवस आहे.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान असल्याचं ते म्हणाले. तसंच तुकाराम महाराजांपासून (Tukaram Maharaj) ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरापर्यंत अनेक महापुरुष महाराष्ट्रात निर्माण झाले त्यांनी देशाला उर्जा दिली असल्याचा उल्लेख मोदींनी केला.

तसंच स्वराज्याबाबत बोलायचं म्हटंल तर, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराज यांची आठवण राष्ट्रभक्तीच्या भावना प्रबळ करतात. आजच्या कार्यक्रमा दरम्यान सावरकरांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचं देखील ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्या त्यागाची आठवण केली. या सर्वांचं लक्ष एकच होते देश स्वांतत्र्य करायचं असं मोदी म्हणाले.

दरम्यान, देशासाठी मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. आता मुंबईसह देशभरात विकास यात्रासुरु आहे. मग मुंबई असो वा महाराष्ट्रातील लहान शहर असोत. सहकाराच्या भावनेने आपणाला पुढे जायच आहे. जगातल्या अनेक देशांना भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामानं प्रेरणा दिल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT