Gunaratna Sadavarte SaamTV
मुंबई/पुणे

ST Strike: ST संपाचा निर्णय अधांतरी; गुणरत्न सदावर्ते म्हणाले...(पाहा Video)

एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

सुरज सावंत

मुंबई : मागील कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटल्याची चिन्हं दिसत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यावरच संपाबाबतचा निर्णय घेऊ असं वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी केलं आहे. त्यामुळे हा संप मिटणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.

आज कोर्टाच्या सुनावणीनंतर ST कर्मचाऱ्यांची (ST Employee) कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांसमोर भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी संपाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसंच ते म्हणाले की, वारंवार सूचना करूनही संप सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

या कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं असं कोर्टाने सांगितल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र, कोर्टाच्या निकालाचे वाचन या कामगारांसमोर करणार आणि त्यानंतर आम्ही पुढची घोषणा करू असं वक्तव्यही त्यांनी केल्यामुळे सदावर्ते आता नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

हे देखील पहा -

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) अजित पवार आणि अनिल परबांवर टीका केली. ज्या १२४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांना वंदन करतो. आज दत्ता सामंताची आठवण येते. सामंतांची हत्या झाली त्यावेळीही पवार यांचे सरकार होते आजही त्यांचे सरकार आहे. या सरकारला कामगारांचे काहीही पडलेले नाही असा आरोपही त्यांनी केला.

या कामगारांचा विषय ज्या ज्या व्यक्तिंनी उचलून धरला, या कामगारांचे मागे उभे राहिले त्यांचे आभार मानतो आम्ही कष्टकरांचे नेतृत्व करतो, मात्र, परब यांनी कामगारांची चेष्ठा करतात, त्यांना खासगी बसेस चालवण्यात इंटरेस्ट आहे असही ते म्हणाले. न्यायालयाने आदेश दिला आहे त्यांनी निर्णय आमच्यावर सोडला आहे. हे कामगार पैशावर तुटले नाहीत, जातीवर तुटले नाहीत. मात्र कामगारांनी एकत्र येत सरकारला दाखवून दिले परिवहन मंत्री ज्या मस्तीत बोलले त्याना लवकर सांगू असा इशाराही त्यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT