राज्य सरकारची मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहचलीच नाही ! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

राज्य सरकारची मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहचलीच नाही !

राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत सगळ्या रिक्षा चालकांपर्यंत पोचलीच नाही. ज्यांना मदत मिळाली त्यांच्या खात्यातून बँक वाल्यांनी कर्जाचा हप्ता म्हणून, ती रक्कम परस्पर वळती केल्याने ऑटो रिक्षा चालक संताप व्यक्त करत आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत सगळ्या ऑटो रिक्षा चालकांपर्यंत पोचलीच नाही आणि ज्यांना मदत मिळाली त्यांच्या खात्यातून बँक वाल्यांनी कर्जाचा हप्ता म्हणून, ती रक्कम परस्पर वळती केल्याने ऑटो रिक्षा चालक अत्यंत संताप व्यक्त करत आहेत. राज्यात जवळपास 20 लाख ऑटो रिक्षा चालक आहेत. प्रत्येक ऑटो रिक्षा चालक केंद्र आणि राज्य सरकारला GST पायी 65 हजार रुपये अदा करतात, अस असून देखील अडचणीच्या काळात सरकार मदत करत नाही आणि केलेली मदतही नीट आमच्या पर्यंत पोहचवत नाही त्यामुळे  सरकार आणि महापालिका  आमची थट्टा का करता असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे.

हे देखील पहा -

कोरोना काळात आमचा व्यवसाय पुर्णपणे बंद होता, त्यामुळे आम्ही बँकांचे ऑटो रिक्षाचे हप्ते भरू शकलो नाही, त्यात महापालिका आणि राज्य शासनाकडून मिळणार शासकीय अनुदान देखिल मिळालं नाही. ज्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाला तो बँकांनी हप्त्याच्या नावावर परस्पर वळवला त्यामुळे आता आम्ही जगायचं कसं असा सवाल ऑटो रिक्षा चालक विचारत आहेत.

ऑटो रिक्षा सेवा ही सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. मात्र आज ही सार्वजनिक वाहतून सेवा बँकांच्या दलालांच्या पेचात सापडली आहे. ऑटो रिक्षा चालकांनकडून हप्ते वसूल करण्यासाठी लोन देणाऱ्या बँकांनी अक्षरशः गुंड प्रवृत्तीच्या वसुली एजंटाची नेमणूक केली आहे. हप्ते चुकवले की हे वसूली एजंट ऑटो रिक्षा चालकांना हाणामारी करतात, रिक्षा ओढून घेऊन जातात, मात्र ऑटो रिक्षा चालक जेव्हा या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे घेऊन जातात, तेव्हा पोलिस ऑटो रिक्षा चालकांची साधी तक्रार सुध्दा दाखल करून  घेत नाही. त्यामुळे आम्ही कुणकाकडे दादा मागायची असा प्रश्न ऑटो रिक्षा चालकांना पडला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT