प्रवीण दरेकर Saam Tv
मुंबई/पुणे

SBI गोळीबार प्रकरण, ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?, प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटना घडलीये. येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटना घडलीये. येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला आहे. गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर ही स्टेट बँकेची शाखा आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? याला राज्य सरकार जबाबदार आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

"अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. कालच मी कायदा सुवस्थेवर अंतिम आठवडा प्रस्ताव आणला होता. आज हा दरोडा टाकला गेला. अशा प्रकारे बॅंक लुटण्यासाठी गोळीबार होत असेल तर कसे जगायचे. ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? याला राज्य सरकार जबाबदार आहे. गुन्हेगाराचा धीर चेपला तर अराजकता माजेल. मी त्याठिकाणच्या डिसीपी यांच्यासोबत बोललो. त्यांना चौकशी करण्यास सांगितलं आहे", असं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.

हेही वाचा -

नेमकं काय घडलं?

मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरातील गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक, डीसीपी विशाल ठाकूर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून, या दरोड्यात आरोपी किती रक्कम घेऊन फरार झाले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. बँकेच्या आत झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना घेतलं ताब्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT