Ulhasnagar News
Ulhasnagar News Saam Tv
मुंबई/पुणे

मुरबाडच्या ट्रॉमा केअर सेंटरला स्टाफ मंजूर; माळशेज घाटातील अपघातग्रस्तांना मिळणार उपचार

अजय दुधाणे

उल्हासनगर - मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये शासनानं १५ जणांचा स्टाफ मंजूर केलाय. त्यामुळं आता हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन तिथं अपघातग्रस्तांवर उपचार करता येणार आहेत.

कल्याण (Kalyan) अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाडमध्ये आत्तापर्यंत फक्त ग्रामीण रुग्णालय होतं. मात्र या महामार्गावर होणारे अपघात, माळशेज घाटात होणारे अपघात पाहता त्यातील जखमींवर उपचार करणं या ग्रामीण रुग्णालयात शक्य होत नव्हतं. त्यासाठी याच ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलं होतं. मात्र तिथं पदनिर्मिती झाली नसल्यानं कर्मचाऱ्यांअभावी हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊ शकलं नव्हतं. मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ जून २०२२ रोजी याबाबत शासनादेश काढत या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पदनिर्मिती केली आहे.

त्यानुसार या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १५ कर्मचारी असणार असून त्यात १ अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, २ बधिरीकरण शास्त्रज्ञ, २ डॉक्टर, १ परिसेविका, २ अधिपरिचारिका अशी ८ नियमित पदं असणार आहेत. तर १ अधिपरिचारिका, ३ कक्षसेवक, १ वाहनचालक, २ सफाई कामगार अशी ७ पदं बाह्ययंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीनं भरायची आहेत. या ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीसाठी आणि तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. आता ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यानं याचा रुग्णांना फायदा होईल, असं म्हणत किसन कथोरे यांनी शासनाचे आभार मानलेत.

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर सतत मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळं या महामार्गावर अपघातांची संख्या देखील मोठी आहे. मात्र माळशेज घाटासारख्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीचे उपचार मिळणं शक्य होत नसल्यानं अनेक जखमींचा कल्याण किंवा उल्हासनगरला पोहोचेपर्यंतच मृत्यू होतो. त्यामुळं या ट्रॉमा केअर सेंटरमुळे भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचा जीव वाचू शकणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aam Papad Recipe: उन्हाळ्यात बनवा आंबट- गोड आंब्याचे पापड; रेसिपी पाहा

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

SCROLL FOR NEXT