मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब Anil Parab यांनी भेट घेत संपावर चर्चा करण्यात येत आहे.
एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी १७ आगारांमधून ३६ बसगाड्या सोडण्यात आले आणि त्यातून ८२६ प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी यावेळी केला आहे. दुसराकडे आझाद मैदानावर आंदोलन स्थळावर आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून येत आहे. जवळपास १५०० हजार कर्मचारी परतले आहेत.
पहा व्हिडिओ-
शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यामध्ये १० मिनिटे चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी महत्वाची चर्चा झाली असल्याची समजत आहे. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल, यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. आझाद मैदानावर आंदोलनामध्ये शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे बघायला मिळाले होते.
यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यामधील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्याकरिता त्यांना वाहने उपलब्ध नाही. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासून देखील त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.