Navi Mumbai Accident  
मुंबई/पुणे

Accident : दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, हॉल तिकीट आणायला गेला अन् काळाने घाला घातला

Navi Mumbai Accident : आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. पण त्याआधीच नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai Accident : नवी मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झालाय. हॉल तिकिटाचे प्रिंट आऊट आणायला गेल्यानंतर काळाने घाला घातला. सायकलवर मित्रासोबत दहावीचे हॉल तिकिटाचे प्रिंट आऊट आणायला गेल्यानंतर डंपरने धडक दिली, त्यामुळे दहावीच्या विद्यार्त्याचा जागीच मृत्यू झालाय. दिपांशु बौद्धची (१५) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तुर्भे नाका येथे अपघात झाला, अपघातानंतर डंपर चालक पसार झाला.

आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. पण त्याआधीच नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे. नवी मुंबईतील तुर्भे नाका येथे डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू जाला आहे. मित्रासोबत सायकलने दहावीच्या हॉल तिकीटचे प्रिंटआऊट काढायला जात असताना अपघात झाला.

डंपर चालकाने भरधाव वेगाने डंपर चालवत सायकलला मागून धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात दहावीचा विद्यार्थी दिपांशू बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता. पण तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले. डंपर चालका विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरमध्ये राहणारा दिपांशु बौद्धची (१५) शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु होणार होती. इंदिरानगर येथून हॉल तिकिटाचे प्रिंटआऊट काढण्यासाठी दिपांशु सायकलवर तुर्भे नाका येथे जात होता. त्याचा मित्र अल्ताफही त्याच्यासोबत होता. फायजर रोडवरून जाताना अमित पॅलेस बारसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या डम्परने त्याला धडक दिली. गंभीर जखमी असलेल्या यात दिपांशुला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT