दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन; शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा...(पहा व्हिडिओ)  Saam Tv
मुंबई/पुणे

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन; शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा...(पहा व्हिडिओ)

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ वर्ष बोर्ड परीक्षा पुढे ढकलत होते, तर अनेक रद्द देखील केले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ वर्ष बोर्ड परीक्षा पुढे ढकलत होते, तर अनेक रद्द देखील केले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने SSC And HSC Exam घेण्यासाठी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. याकरिता राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रामधील विविध तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात मत जाणून घेण्यात बैठक पार पडली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे.

पहा व्हिडिओ-

राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना परिस्थिती अशीच राहिली किंवा तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास दहावी, बारीवीच्या परीक्षांत काही बदल करता येईल का? लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्याकरिता कोणकोणत्या खबरदारी घ्याव्या लागणार? अथवा त्याकरिता वेगळे पर्याय देता येतील का? अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे.

तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी सज्ज असणार आहेत. यासाठी नियोजन कसा करता येणार य़ावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्य़ेने मागील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले होते. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकालातून गुणांची टक्केवारी वाढली तरी प्रत्यक्ष गुणवत्ते संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय संस्था चालकांच्या प्रतिनिधीनी केली आहे. यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण विभागाकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा निर्णय जाहीर करणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मात्र, परीक्षेकरिता किती तयारी झाली, यावर शिक्षण विभागाने चर्चा केली आहे. या चर्चेत दहावी, बारावीच्या परीक्षा कधी आणि कशा पध्दतीने घेता येणार? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का? लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी तयार आहेत का? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर मत जाणून घेण्यात आली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT