Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' का जावं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय?

Bharat Jadhav

पूर्वजांकडून मिळालेला वारसा

कुलदैवत म्हणजे एखाद्या कुळाने पिढ्यान्‌पिढ्या श्रद्धेने पूजलेली देवता. हे केवळ देवतेचे नाव नसून कुटुंबाची श्रद्धा, कुलपरंपरा, धार्मिक संस्कार आणि पूर्वजांकडून मिळालेला वारसा यांचे प्रतीक मानले जाते.

वर्षातून एकदा कुलदैवतेचं तरी दर्शन घ्यावं

अनेकजण आपल्या कुटुंबियांसह वर्षातून एकदा तरी भेट देतात, यामागे नेमकं काय कारण आहे? वर्षातून एकदा कुलदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यामागे धार्मिक तसेच भावनिक महत्त्व असते.

कुलदैवत म्हणजे काय?

हिंदू धर्मपरंपरेत कुलदैवताला विशेष महत्त्व असते. एखाद्या कुटुंबाने किंवा कुळाने पिढ्यान्‌पिढ्या ज्या देवता किंवा देवीची श्रद्धेने पूजा केली जाते, त्याला कुलदैवत म्हटले जाते.

परंपरा

कुलदैवताची परंपरा फक्त धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसते. ही परंपरा कुटुंबाच्या संस्कृतीशी, पूर्वजांशी आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या धार्मिक संस्कारांशी जोडलेली असते. कुटुंबातील लग्न, मुंज, नामकरण, वास्तुशांती किंवा इतर शुभकार्यांच्या वेळी कुलदैवताचे स्मरण करण्याची अनेक घराण्यांमध्ये परंपरा आहे.

मंदिरात जाऊन कुलदैवतेचे दर्शन का घेतले जाते?

वर्षातून एकदा कुलदैवताचे दर्शन घेतल्याने पुढच्या पिढीलाही आपल्या कुळाची आणि परंपरेची ओळख राहते. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवतेचे स्मरण करून दर्शन, पूजा आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे

कुलाचाराचा भाग

काही घराण्यांमध्ये ठरावीक तिथी, सण किंवा उत्सवाच्या दिवशी कुलदैवताला भेट देण्याची परंपरा असते. अशा वेळी दर्शन घेणे हा त्या कुटुंबाच्या कुलाचाराचा भाग असतो.

नवस आणि धार्मिक संकल्प

कुटुंबाने केलेला नवस, पूजा किंवा धार्मिक संकल्प पूर्ण झाल्यानंतर कुलदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे.

कुटुंबाच्या एकोप्यासाठी

कुलदैवताच्या दर्शनाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच कुटुंबातील नातेसंबंधही दृढ होण्यास मदत होते. दरवर्षी दर्शनाला जाऊन आपण त्या परंपरा आणि मूळ शक्तीशी जोडलेले राहतो.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Weight Regain: कमी झाल्यानंतर वजन पुन्हा वाढू लागलंय? कसं कराल कमी?