Weight Regain: कमी झाल्यानंतर वजन पुन्हा वाढू लागलंय? कसं कराल कमी?

Bharat Jadhav

पुन्हा वजन वाढू लागलंय?

अनेक लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. योग्य आहार आणि व्यायाम केल्यानंतर वजन कमी करत सडपातळ होतात. पण स्लीम ट्रीम लूक मिळाल्यानंतर काहीचं पु्न्हा वजन वाढतं. अनेक लोकांचे वजन काही काळानंतर पुन्हा वाढू लागते. त्यामुळे, वजन कमी करण्यासोबतच ते कसे टिकवून ठेवावे, हे जाणून घेऊ.

जुन्या सवयी

वजन कमी केल्यानंतर जर जुन्या सवयी पुन्हा सुरू झाल्या, तर वजन पुन्हा वाढण्याचा धोका वाढू शकतो. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून आणि चांगल्या दैनंदिन सवयी जोपासल्यास वजन वाढीचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो.

वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा का वाढते?

यू.एस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस (NIDDK) च्या मते, कमी केलेले वजन दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवणे सोपे नसते. वजन कमी केल्यानंतर अनेक लोक कॅलरीज असलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करतात. त्यांची शारीरिक हालचाल कमी करतात.

कमी कॅलरीज खर्च करण्याची ताकद

वजन कमी झाल्यानंतर शरीर पूर्वीपेक्षा कमी कॅलरीज खर्च करू शकते. यामुळे वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. जर आरोग्यदायी सवयी सोडल्या, तर वजन पुन्हा वाढू शकते.

वाढलेलं वजन कसं कराल कमी?

वजन कमी केल्यानंतरही आरोग्यदायी सवयी कायम ठेवा. दैनंदिन जीवनात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा आणि तुमच्या गरजांनुसार संतुलित आहार घ्या. वेळोवेळी तुमचे वजन तपासा, जेणेकरून वजन वाढल्यास ते सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात येईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

दीर्घकाळापर्यंत चांगल्या सवयी सातत्याने सुरू ठेवल्या वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. तरीही जर तुमचे वजन वाढू लागले, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे?

आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, कमी चरबीयुक्त दूध किंवा दही आणि प्रथिनांनी (प्रोटीन) समृद्ध पदार्थांचा समावेश करा. साखरयुक्त पेये, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले स्नॅक्स यांचे सेवन मर्यादित ठेवावे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील प्रेम कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत