मुंबई : मुंबईतील मानखुर्दच्या शिवनेरी येथील 25 वर्षीय श्रुष्टी सुरेश कुळ्येने यूपीएसी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. तिने UPSC CSE 2024 मध्ये कोणत्याही कोचिंगशिवाय 831 वा अखिल भारतीय क्रमांक पटकावला आहे. श्रृष्टीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत मानखुर्दला पहिल्या IAS चा मान मिळवून दिला आहे. श्रुष्टीने प्रचंड मेहनत आणि जिद्दीने आपले स्वप्न साकारलं. तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रुष्टीचे वडील सुरेश कुळ्ये प्रिंटिंग मशीन ऑपरेटर आणि आई सपना गृहिणी आहेत. आर्थिक अडथळ्यांवर मात करत तिने BA (पोलिटिकल सायन्स) पूर्ण केलं. एम-पॉवर लायब्ररीत तिने रोज 12 तास अभ्यास केला. जिथे शांत वातावरण, टॅब्स आणि सहकारी स्टाफचा आधार मिळाला. तिच्या यशात तिच्या स्वतःच्या मेहनतीलाच सर्वाधिक श्रेय आहे.
श्रुष्टी पुढे म्हणाली, 'माझ्या तयारीत टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि डीबीएम एम-पॉवर लायब्ररीने अभ्यासासाठी उत्तम जागा पुरवली. पण माझे यश हे माझ्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ आहे. मी सर्वांचे आभार मानते. ज्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ दिली'. श्रुष्टीचे हे ऐतिहासिक यश मानखुर्दसाठी अभिमानास्पद आहे. कोचिंगशिवाय मिळवलेली ही कामगिरी अनेक तरुणांना स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देईल.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ या अंतिम निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत देशभरातील एकूण १००९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी राज्यातील ९० हून अधिक उमेदवारांनी घवघवीश यश मिळवलंय. अर्चित पराग डोंगरे राज्यातून पहिला आला आहे. त्याने देशातून ३ रा क्रमांक पटकावला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे याने २६ वा क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या १०० मध्ये राज्यातील ७ उमेदवारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.