fake income tax raid saam tv
मुंबई/पुणे

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Fake IT Raid Busted in Mumbai: अंधेरीत ‘स्पेशल 26’च्या धर्तीवर बनावट आयकर छापा टाकून व्यावसायिकाकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयकर निरीक्षक आणि कर सहायकासह 10 आरोपींना अटक केली आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर बनावट छापा टाकून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बनावट छाप्यात आयकर विभागातील आयकर निरीक्षक आणि कर सहायक सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोघांसह एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर अजूनही एक आयकर निरीक्षक दर्जाचा अधिकारी फरार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.त्यामुळे या प्रकरणाला ‘स्पेशल 26’च्या धर्तीवरील बनावट छाप्याचे स्वरूप असल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी राजकुमार कन्डासमी (४९) यांच्याकडे पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करणारा संतोष उदय खोपटकर (३७) याचा फिर्यादीसोबत वाद झाला होता. त्यानंतर कन्डासमी यांनी संतोषला सहा महिन्यांचा पगार न देता नोकरीवरून काढून टाकले होते. याचा राग मनात धरून संतोषने फिर्यादीबाबत त्याच्याकडे असलेल्या माहितीचा गैरवापर करून आपल्या साथीदारांसोबत कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या कटानुसार आरोपींनी आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी व कर्मचारी असल्याचा बनाव केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश करून बनावट सरकारी ओळखपत्रे दाखवण्यात आली. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले, तर कार्यालयातील इतर सुमारे १० कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले. तसेच त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला.यानंतर आयकर विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. कारवाई टाळायची असल्यास १ कोटी रुपयांची खंडणी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ८१२/२०२६ दाखल करून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत सुरुवातीला सहा जणांना अटक केली. तपासादरम्यान या कटात आणखी काही जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामध्ये सुरेश महावीरप्रसाद मिश्रा (५७), आयकर निरीक्षक आणि सुनिल मनोहर गोरे (५९), कर सहायक, हे आयकर विभागात कार्यरत असल्याचे समोर आले. हे दोघे आरोपी क्रमांक २ ते ६ तसेच जितु उर्फ जितेंद्र मोरे आणि अशोक शिंदे यांच्यासोबत फिर्यादीच्या कार्यालयात गेले होते आणि कथित फौजदारी कटात सहभागी असल्याची माहिती तपासात समोर आल्याने त्यांनाही १० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष उदय खोपटकर, विनय रमेश मोरे, प्रेम किसन सबनानी, प्रज्ञा हरीश माईन, रेश्मा शामराव वारंग, सबीना हाफीज शेख, आयकर निरीक्षक सुरेश महावीरप्रसाद मिश्रा, कर सहायक सुनिल मनोहर गोरे, जितु उर्फ जितेंद्र नामदेव मोरे आणि अशोक विठोबा शिंदे यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. बनावट सरकारी अधिकारी बनून छापा, नागरिकांना ताब्यात घेणे आणि तब्बल १ कोटींची खंडणी मागणे, तसेच प्रत्यक्ष आयकर विभागातील कर्मचाऱ्यांचा कथित सहभाग समोर आल्याने या प्रकरणाचा पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT