mumbai police  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26'; बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची लूट

स्पेशल 26 या चित्रपटात खोटे अधिकारी बनून जशी लूटमार करण्यात आली होती तशीच घटना मुंबईतून समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Mumbai News: मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्पेशल 26 या चित्रपटात खोटे अधिकारी बनून जशी लूटमार करण्यात आली होती तशीच घटना मुंबईतून समोर आली आहे. बनावट ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून करोडोची लूट केलील आहे. (Latest Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर 4 अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले. सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दुकाणात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

चोरीच्या घटनेची आता संपूर्ण मुंबईभर चर्चा सुरू आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोख लंपास केल्याने पोलीस प्रशासन देखील हादरले आहे. या प्रकरणात दोन संशियत व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दोघांची गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यास दोघांवर अटकेची कारवाई केली जाईल असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांंगितले आहे.यात आता पोलीस देखील चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आरोपींना शोधू शकतील का? आणि या घटनेचा शेवट देखील फिल्मी असेल का असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT