Maharashtra CM Eknath Shinde News Saam TV
मुंबई/पुणे

गणपती मंडळांसाठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी गणपती मंडळांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. यावर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील शेवेटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरला परवानी देण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली.

ऐतिहासिक वारसा गणपती मंडळ पुण्याला आहे. पुण्याला अनेकजण गणेशोत्सव पाहायला येत असतात. काही मागण्या होत्या, त्या मंडळासोबत बैठक पार पडली. कोविडमुळे सण उत्सव साजरा करता आला नव्हता, पण आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचे आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

मंडप शुल्क माफ करण्यात आला आहे. परवानगीसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही जिल्हाधिकारी सगळे पाहणार आहेत. मिरवणूका नियम पाळून करू. कुठलीही अडचण येणार नाही हे पाहूया. कोर्टाचे नियम पाळून सण साजरे करुया. शेवटचे पाच दिवस १२ पर्यंत परवानगी आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही

राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant News )

'गाडीवर दगड मारून पळून जाणे म्हणजे मर्दुमकी नाही. हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचे काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निश्चितच मी विजय होईल- झिशान सिद्दीकी

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT