Uday Samant, Aditya Samant
Uday Samant, Aditya SamantSaam Tv

'या गद्दारांना लोक...'; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे.
Published on

पुणे: राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर आता माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Uday Samant News )

Uday Samant, Aditya Samant
दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; सामंतांवरच्या हल्ल्यानंतर CM एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, आपल्या माध्यमातून उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले. मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करीन कारण या गद्दारांना लोक मतपेटीतून उत्तर देतील. हे सरकार नक्की कोसळेल हे कुणी केले याचीही मी माहिती घेत आहे.

Uday Samant, Aditya Samant
मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा; केदार दिघेंनी धमकावल्याचा पीडितेचा आरोप

संवाद यात्रेवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या संवाद यात्रेत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती. इतर राजकीय दौऱ्यापेक्षा हा अनुभव वेगळा होता. पाठीत वार झाल्यानंतरही लोकांचे आमच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. राजकारण आतापर्यंत इतक्या खालच्या पातळीवर झालेले पाहिले नव्हते. ही गद्दारी कुणालाच पटलेली नाही. जनता सर्व पाहते, मराठी माणसावर अन्याय होतोय, शिवसेना तोडणाचा प्रयत्न होतो. ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.

हे कॅबिनेट होणार नाही, कारण हे घटनाबाह्य आहे. यांचा शपत विधी घटनाबाह्य आहे. खरा प्रश्न हा आहे, या बेकायदेशीर सरकारचा खरा मुख्यमंत्री आहे तरी कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लगावला.

मी गद्दार हे ४० जणांना बोलत आहे. या भांडणात इतर कुणी पडू नये. अन्यथा त्यांचा हात यात असू शकतो. या गद्दारांमागे कुठली अदृश्य शक्ती नाही, तर या भांडणात हे का पडत आहेत. असा पडलेला प्रश्न आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com