चंद्रकांत पाटील Saam Tv
मुंबई/पुणे

...तर विधानसभा अध्यक्ष भाजपचा असेल! - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात (Maharashtra) काल झालेल्या परिस्थितीवर भाजपच्या विविध नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: महाराष्ट्रात (Maharashtra) काल झालेल्या परिस्थितीवर भाजपच्या विविध नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतू काल झालेल्या परिस्थितीवर भाजपचा काय मुड आहे, याबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांक पाटील (Chandrakant Patil) यांनी आज साम टिव्हीला सविस्तर मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अनेक मोठी विधीनं देखील केली आहेत.

12 आमदारांच्या निलंबणाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले आमदार निलंबीत करण्याची उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackaray) इच्छा नव्हती. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीसाठी 12 आमदार निलंबीत केले असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नियम तोडून अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ नका रितसर निवडणूक झाली तर अध्यक्ष भाजपचा असेल असेही ते म्हणाले. ''माझी अशी माहिती आहे 12 आमदारांच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी आग्रही होती'' असे पाटील म्हणाले आहेत.

दोन्हा पक्षातील वाद विकोपाला का गेला असा प्रश्न विचारला असता आमच्यात वाद लावण्याचं काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी केलं, आमची युती तोडण्याचं कामही याच दोन पक्षांनी केलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्यात वाद लावूनच तर सत्तेवर आली असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले दोन जातींमध्ये भांडणं लावण्याचं कामही या दोन पक्षांनी केलं आहे. राज ठाकरे जे बोलले ते काय चूकीचं नाही असं बोलत चंद्रकांत दादांनी ठाकरेंच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

शिवसेना आणि तुमच्यात एवढी भांडणं, कार्यकर्तांनी एकमेकांची गचांडी पकडली. तरीही तुम्ही शिवसेनेला मोठा भाऊ मानता? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी त्यावर मोठे विधान केले आहे. कितीही माऱ्यामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ हा सख्खाच असतो तो सावत्र होत नाही. कितीही विरोध झाला कितीही भांडणं झाली तरीही दोघांचं रक्त एकच एकच आहे. ते म्हणजे हिंदूत्वाचं. पुढे ते म्हणाले ''आमच्यात भांडणं लावण्याचं काम हे राष्ट्रवादी आणि काँग्रसने केलं असल्याचही पाटील म्हणाले आहेत''.

नारायण राणे यांच्या वक्तव्यावर सविस्तर बोलताना ते म्हणाले, एक वाजवून देईल ही राणेंची बोलीभाषा आहे. प्रत्येकाची बोलण्याची शैला ही वेगवेगळी असते. जशी उद्धव ठाकरेंची शैली आहेत तशीच शैली राणेंची आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलले याचा विचारही त्यांनी करावा असे पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ज्याप्रमाणे शिवसेनेवर टीका करत होते, त्या टीकेला द्यायला उत्तर नव्हते म्हणून कालचा ड्रामा केला असल्याचं पाटील म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT