Pune Police  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: क्षुल्लक कारणावरुन पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला संपवलं, पुण्यातील मन सून्न करणारी घटना

पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.

Dnyaneshwar Choutmal

पुणे : आई रागावते म्हणून मुलाने आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उरळी कांचन भागात ही घटना घडली आहे आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.

अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो या कारणावरुन आई मुलाला रागावत असत. या क्षुल्लक कारणावरुन मुलाने आईचा खून केला आहे. तस्लिम शेख (३७) असे मृत आईचे नाव असून तिचा मुलगा जिशन शेख (१८) यानेच हत्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. (Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लिम शेख या त्यांच्या पती आणि मुलासह उरळी कांचन भागात राहत होत्या. सुरुवातीला तस्लिम यांनी आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या आहे, असे निष्पन्न झाले. पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी केली असता जिशनने घडलेला सगळा प्रकार सांगितला.

बारावीला असलेला जिशन हा अभ्यास करत असताना मोबाईल पाहतो म्हणून त्याच्या आईने त्याला रागावले होते आणि मारलंही होतं. यामुळे चिडलेल्या जिशनने त्याच्या आईला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून केला.

घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली. मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कसा झाला? पवई गोळीबाराची इनसाइड स्टोरी

Raj Thackeray Speech : EVM व्होटचोरी डेमो ते १ तारखेचा मोर्चा; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT