SOMESHWAR SUGAR FACTORY RECORD SUGARCANE RATE OF RS 4000 PER TONNE saam tv
मुंबई/पुणे

सोमेश्वर कारखान्याचा विक्रमी ऊसदर, टनाला चार हजार रुपये

Record Sugarcane Rate: Someshwar Factory Offers Rs 4,000: बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याने विक्रमी ऊसदर जाहीर केला आहे. सोमेश्वरची किमया इतर कारखान्यांना पण साधली जाणार का ? सर्वाधिक दर मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रीया दिल्या आहेत ? पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

राज्यातील सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे केंद्र आहेत. त्यामुळे प्रत्येक गाळप हंगामात कोणता कारखाना उसाला किती दर देणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. अशातच बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं 2025-26 गाळप हंगामासाठी अनुदानासह टनाला 4 हजारांचा उच्चांकी ऊसदर जाहीर केलाय.

'सोमेश्वर'कडून उसाला विक्रमी दर

सध्याचा FRP दर - 3,285

दिलेला दर -4000

वाढीव दर - 725

दिवंगत नेते अजितदादा यांच्या कडक शिस्तीमुळे राज्यातील सर्वोच्च दर देऊ शकलो. त्यांच्या स्मृतींना हा निर्णय अर्पण अशी भावना कारखान्याच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे उच्चांकी दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मार्चमध्ये तुटलेल्या उसाला चार हजार रुपये भाव दिला आहे. मात्र त्याची संख्या नगण्य आहे. याकडे लक्ष वेधत शेतकरी नेते राजू शेट्टींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

२०२५-२६ हंगामात सोमेश्वर कारखान्याने सुमारे १३ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच वीज निर्मिती, इथेनॉल आणि अल्कोहोलचंही मोठं उत्पादन घेतले आहे. अनेक साखर कारखान्यांना घरघर लागली असताना सोमेश्वरची किमया इतर कारखान्यांना पण साधली जाणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT