किरीट सोमय्या- संजय राऊत - Saam Tv
मुंबई/पुणे

Raut Vs Somaiyya: सोमय्यांच्या विक्रांत निधी प्रकरणात शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव

आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी गोळा केलेला निधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज याच विषयावर शिवसेना संसदेत स्थगन प्रस्ताव मांडणार आहे

Amit Golwalkar

नवी दिल्ली : आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी गोळा केलेला निधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज याच विषयावर शिवसेना संसदेत स्थगन प्रस्ताव मांडणार आहे. (Somaiya Vs Sanjay Raut Shivsena to move Adjournment motion in parliament)

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ही नोटीस दिली आहे. राज्यसभेत हा स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या मुद्द्यावर सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिवसेना (Shivsena) आक्रमक राहणार असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयएनएस विक्रांत ही नौदलाची माजी विमानवाहू नौका वाचवण्याकरिता जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल सांगितले.

आजही राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्यांवर आरोप करतानाच राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT