Facebook Crime Saam TV
मुंबई/पुणे

अमृता फडणवीसांना फेसबुकवर शिवीगाळ करणं पडलं महागात; आरोपीचा मोबाईल जप्त करताच समोर आलं धक्कादायक वास्तव

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना फेसबुकवर शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली आहे. स्मृती पांचाळ असे महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल जप्त केला आहे. या महिलेला ठाणे (Thane) जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकजण सोशल मीडियावरती आपला वेळ घालवत असतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवरती जो नसेल तो आळशी अशी स्थिती सध्याची आहे. सोशल मीडियाचे (Social Media) जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. अनेक जण या माध्यमांचा वापर आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून करतात तर काही रिकामटेकडे या माध्यमांवरुन राजकीय, सामाजिक, आणि कला क्षेत्रातील लोकांना ट्रोल करत बसतात.

पाहा व्हिडीओ -

या ट्रोलींगचे प्रमाण खूपच वाढलं असून या ट्रोलींग मुळे अनेक वाद होतात. शिवाय पोलिसांकडून या लोकांवरती कारवाई देखील झाल्याचं आपण पाहिलं आहे. अशाच एका ट्रोलर महिलेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांच्या फेसबुक (Facebook) पोस्टवरती अश्लिल भाषेत कमेंट केली होती.

अमृता फडणवीसांच्या पोस्टवर शिवीगाळ करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. कारण या शिवीगाळ प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातून अटक केली आहे. शिवाय तिचा मोबाईल देखील जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टखाली एका महिलेने एकामागून एक चार अपमानास्पद कमेंट केल्या होत्या. या कमेंट इतक्या घाणेरड्या होत्या की, त्यावेळीच पोलिसांनी एका अज्ञात फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी आयपीसी कलम ४१९, ४६८, ४६९, ५०४, ५०५ (१)(सी), आणि ५०९ आणि कलम ६७, ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, अटक केलेल्या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी 'गणेश कपूर' नावाचे बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अकाऊंटचा वापर करून ती अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, कोणताही पोस्ट कमेंट करताना आपल्या मर्यादांचे उल्लंघन करु नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT