एवढा खर्च पेंग्विन्ससाठी की, पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठी? - मनसेची पोस्टरबाजी Saam Tv News
मुंबई/पुणे

एवढा खर्च पेंग्विन्ससाठी की, पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठी? - मनसेची पोस्टरबाजी

पेंग्विन्सच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेने तब्बल १५ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्यात आर्थिक तंगी असताना एवढा अवास्तव खर्च करण्याला भाजप, मनसे आणि कॉंग्रेसचाही विरोध आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील वीर जीजामाता भोसले उद्यानात २०१६ साली मुंबई महापालिकेने आठ पेंग्विन्स आणले होते. त्यावेळी महापालिकेने 25 कोटी खर्च करून पेंग्वीन पक्षी आणले आणि त्यांच्या निवाऱ्यासाठीही कोट्यावधी रूपये खर्च केले मात्र तरीही यातल्या एका पक्षाचा मृत्यू झाला होता. पेंग्विनच्या देखभालीचा खर्च पाहता कॉंग्रेससह अनेक प्राणीप्रेमी संस्थांनी पेंग्विन भारतात आणण्याला विरोध केला होता. आता या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. त्याचं कारण म्हणजे या पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेने काढलेले टेंडर. (So much expense for the penguins, or to feed the penguin gang? - MNS poster campaign)

हे देखील पहा -

या पेंग्विन्सच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेने तब्बल १५ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. पेंग्विन्सच्या तीन वर्षांच्या देखभालीसाठी हे १५ कोटींचे टेंडर काढले आहे. राज्यात आर्थिक तंगी असताना एवढा अवास्तव खर्च करण्याला भाजप, मनसे आणि कॉंग्रेसचाही विरोध आहे. मनसेने तर मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टरबाजी करत ''एवढा खर्च पेंग्विन्ससाठी की, पेंग्वीन गॅंगला पोसण्यासाठी?'' असा सवाल उपस्थित केलाय.

मुळात पेंग्विन्सच्या देखभालीसाठी महापालिकेचे डॉक्टर्स, निवासस्थानाची आणि शयनकक्षाची देखभाल करणारे कर्मचारी असताना वेगळे टेंडर काढून ठेकेदारांचे खिसे भरण्याचा आरोप विरोधीपक्ष नेते रवी राजा आणि भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. तसेच महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र लिहीत हे कंत्राट रद्द करण्याची मागणी भाजप आणि कॉंग्रेसने केली आहे.

मनसैनिक संतोष धुरी यांनी मनसेने लावलेले पोस्टर शेयर केले आहे. या पोस्टरमध्ये ''एवढा खर्च पेंग्विन्ससाठी की, पेंग्वीन गॅंगला पोसण्यासाठी?'' असा खोचक सवाल विचारण्यात आला आहे. त्यामुळे २०१६ पासून सुरु असलेल्या पेंग्विनच्या मुद्दयावर विरोधकांनी शिवसेनेला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत विरोधकांवर पलटवार केला आहे. पेंग्विनवरुन राजकारण करणारे पेंग्विन पाहून मजा घेतात असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT