ठाणे - आता हळू हळू ठाण्यात (Thane) करोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या ही पाचशे पर्यंत पोहचली असून ठाण्यात चक्क चौथी लाट तर येत नाही ना अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा मास्क सारखे निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे देखील पाहा -
गेले २ वर्ष लोकांना अनेक बंधनात राहावं लागलं. मात्र कोरोना कमी झाल्यावर राज्य सरकारने निर्बंध हटवल्यामुळे नागरिक कोणत्याही चिंतेविना रस्त्यावर विना मास्क फिरू लागले. मात्र ठाण्यातील कोरोनाची आकडेवारी पाहता नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिला आहे.
तसेच निर्बंध हटवल्यानंतर नंतर च्या काळात लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर यांचे पालन सोडल्यामुळे चौथ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि प्रशासन या साठी सज्ज झाले असून अधिक बेड, अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे असे देखील कैलास पवार यांनी सांगितले आहे. तर मंकीपॉक्स हा आजार तितका भयंकर नसून त्याबाबत देखील यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही अशी दिलासादायक बाब पवार यांनी सांगितल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.