उल्हासनगरात पुन्हा कोसळला इमारतीचा स्लॅब ! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात पुन्हा कोसळला इमारतीचा स्लॅब !

उल्हासनगर परिसरात स्लॅब कोसळण्याचे सत्र चालूच असून दोन महिन्यातली स्लॅब कोसळण्याची तिसरी घटना आज घडली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात इमारतींचे स्लॅब कोसळण्याचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या पहिल्या माळ्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. उल्हासनगरच्या कॅम्प १ परिसरातील A ब्लॉकमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. Slab of building collapses again in Ulhasnagar!

हे देखील पहा -

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील A ब्लॉकमध्ये देवऋषी अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सदनिकेत सिलिंगच्या रिपेयरिंगचं काम सुरू होतं. यावेळी अचानक पहिला माळ्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर आला. या घटनेत पहिल्या माळ्यावरील सदनिकेत असलेले तीन जण किरकोळ जखमी झाले.

या घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही इमारत संपूर्णपणे रिकामी केली. आता महापालिकेच्या इंजिनियर्सकडून या इमारतीचा स्टॅबिलिटी रिपोर्ट घेऊनच इमारतीत रहिवाशांना राहू द्यायचं की नाही, याबाबचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यात उल्हासनगर शहरातली इमारतीचा स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २ इमारतींचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर उल्हासनगर शहरातील सर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक इमारती पाडण्याची कारवाई उल्हासनगर महापालिकेकडून सुरू करण्यात आली होती.

यावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. रहिवाशांचे पुनर्वसन, इमारतींचा पुनर्विकास यावरून शहरात मोठा गदारोळ सुरू असतानाच आता पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची तिसरी दुर्घटना घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देवऋषी अपार्टमेंटचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये नव्हता, तरीसुद्धा या इमारतीत स्लॅब कोसळल्याने सर्वच इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्यामुळे आता धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT